IGNOU इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली “ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट” पदांची भरती

 

IGNOU इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली

ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट पदांची भरती

ignou recruitment


पद : ज्युनियर असिस्टंट कम टायपिस्ट (JAT)

एकूण रिक्त पदे - २००

खुला

८३

ईडब्ल्यूएूस

२१

इमाव

५५

अजा

२९

अज

१२

दिव्यांग,

माजी सैनिक

२०

गुणवान खेळाडू उमेदवारांसाठी

१०

एकूण रिक्त पदे

२००

 

परीक्षा घेणार: राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NAT)  परीक्षा घेणार आहे.

वेतन: वेतन श्रेणी लेव्हल-२ (रु.१९,९०० - ६३,२००) अंदाजे किमान वेतन रु. ३४,५००/- दरमहा.

पात्रता : १२ वी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटरवर टायपिंग स्पीड (1) इंग्लिश ४० शपप्र.मि.  (2) हिंदी ३५ श.प्र.मि.

वयोमर्यादा: (दि. ३१ मार्च २०२३ रोजी) १८ते २७ वर्षे (कमाल वयोमर्यादा - इमाव -३० वर्षे; अजा/अज - ३२ वर्षे; (दिव्यांग - खुला - ३७ वर्ष, इमाव – ४० वर्षे, अजा/अज - ४२ वर्षे); (विधवा/घटस्फोटीत महिला - ३५ वर्षे, अजा/अज - ४० वर्षे) (गुणवान खेळाडू - ३२ वर्षे; अजा/अज खेळाडू - ३७ वर्षे) ).

निवड पद्धती : स्तर 1 =  कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT).

हिंदी/ इंग्रजी भाषेतून  घेतली जाईल. ज्यात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे (MCQ) एकूण १५० प्रश्‍न, एकूण गुण १५०, वेळ २ तास असेल.


जनरल अवेअरनेस

३०

रिझनिंग अँड जनरल इंटेलिजन्स

३०

मॅथेमॅटिक्स अँबिलिटी

३०

हिंदी/इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रहेन्शन

३०

कॉम्प्युटर नॉलेज

३०

 

यावर आधारित प्रत्येकी ३० प्रश्‍नांचा समावेश असेल.


कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT)  ची तारीख नंतर जाहीर केली जाईल आणि CBT मधून रिक्त पदांच्या १० पट उमेदवार स्तर 2 साठी निवडले जातील.

स्तर 2:=   स्किल टेस्ट/ टायपिंग टेस्ट घेतली जाईल. जी फक्त पात्रता स्वरूपाची असेल.

परीक्षा केंद्र: मुंबई/ नवी मुंबई, नागपूर, पुणे; बेंगलुरू, धारवाड, हैदराबाद/ सिकंदराबाद; अहमदाबाद/ गांधीनगर, राजकोट; भोपाळ, इंदौर; रायपूर इ. देशभरातील ५२ केंद्र.

अर्जाचे शुल्क: खुला, इमाव, इडब्ल्यूएस - रु. १,०००/-; अजा, अज, महिला - रु. ६००/-; दिव्यांग उमेदवारांना फी माफ आहे.

 

ऑनलाइन अर्ज: https”//ignourecruitment.nta.nic.in किंवा  https”//recruitment.nta.nic.in वेबसाईटवर दि. २० एप्रिल २०२३ (२३.५० वाजे) पर्यंत करावेत. ऑनलाइन अर्जातील तपशिल बदल करावयाचा असल्यास वेबसाईटवर दि. २६ व २२ एप्रिल २०२३ (२३.५० वाजे) पर्यंत करता येईल.

थोडे नवीन जरा जुने