महाराष्ट्र
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, राज्य कामगार विमा योजनेतील “वैद्यकीय अधिकारी” या पदांची भरती (MPSC) मार्फत केली
जाईल.
महाराष्ट्र
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा द्वारा प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार वैद्यकीय
अधिकारी, महाराष्ट्र
वैद्यकीय विमा सेवा गट-अ रिक्त पदे भरण्यासाठी पात्र
उमेदवारांकडून अर्ज
मागविण्यात येत आहेत. सदर पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) मार्फत राज्य कामगार विमा योजनेत होणार आहे. एकूण रिक्त पदे
१४६ (146). इच्छुक व पात्र
असलेल्या उमेदवारांनी दिनांक २/५/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
आरोग्य विभाग Recruitment
पद |
पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी |
अजा- २७, अज-५, विजा-अ-५, भज-क- २, भज-ड-२, विमाप्र-२, इमाव-२४, आदुघ-१५, खुला-६४, ६ पदे दिव्यांगांकरिता (अस्थिव्यंगता/ मेंदू पक्षाघात इ.-४ पदे; स्वमग्नता /
मंदबुद्धी इ. - २ पदे) खेळाडूंकरिता ७ पदे, अनाथांसाठी १ पद
आरक्षित. |
एकूण |
१४६ |
आरोग्य विभाग Recruitment
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज https://mpsconline.gov.in या
संकेतस्थळावर करावेत.
शैक्षणिक पात्रता :
- M.B.B.S. पदवी उत्तीर्ण
- मेडिकल सायन्समधील पदव्युत्तर उच्च पात्रता.
वयोमर्यादा: (१ ऑगस्ट २०२३ रोजी)
- किमान वयोमर्यादा: १९ वर्षे
- कमाल वयोमर्यादा: ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
- मागासवर्गीय/आदुघ/ अनाथ/ खेळाडू - ४३ वर्षे
- दिव्यांग उमेदवार- ४५ वर्षे
निवड पद्धती:
- उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा अनुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता / अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे किंवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- चाळणी परीक्षा न घेतल्यास फक्त मुलाखतीमधील गुणवत्तेच्या आधारित अंतिम निवड केली जाईल.
अर्जाचे
शुल्क:
- खुला/ इमाव : ३९४ रु
- मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ: २९४ रु
अर्जची अंतिम तारीख: दिनांक – २/५/२०२३
अधिक
व
सविस्तर
माहितीसाठी https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर चेक
करा.
कृपया महाराष्ट्र
शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागा मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली मूळ जाहिरात आवश्यक वाचन करून
घ्या.
आरोग्य विभाग Recruitment